पारनेर : रक्तदान शिबीर राबवून अ‍ॅड. राहुल झावरे ‘सरपंच’ पदाचा पदभार स्वीकारणार

0

पारनेर : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावचे नवनिर्वाचित सरपंच अ‍ॅड.राहुल झावरे यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्विकारताना सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात स्वत: सरपंच झावरे इतर ग्रामपंचायत सदस्य, महिला यांसह 100 च्यावर कार्यकर्त्यांनी रक्तदानाचा संकल्प केला आहे.

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे उद्या शुक्रवारी (दि.24) रोजी सरपंच राहुल झावरे यांचा पदग्रहण सोहळा, उपसरपंच निवड, रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामस्थानतर्फे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील वनकुटे हे अतिदुर्गम व मागसलेले गाव स्वातंत्र्यानंतरही येथे मुलभुत सुविधा पोहचल्याच नाहीत.

या गावात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना देखील येथे वर्षानुवर्ष हे लोक सरकारी योजनांपासून वंचित होते. ही बाब ओळखून गावातील उच्चशिक्षित व होतकरू तरुण राहुल झावरे हे सर्वसामान्यांसाठी हिरहिरिने कामाला लागले. आमदार विजयराव औटी, शिवसेना तालुका प्रमुख श्री.निलेश लंके यांनी याकामी राहुल झावरे यांना मोठी मदत झाली.

शुक्रवारी राहुल झावरे सरपंच पदाचा पदभार स्विकारणार आहेत मात्र कोणताही डामडौल न करता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी जपत पदभार स्विकारण्याचा संकल्प नवनिर्वाचित सरपंच व ग्रामस्थांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*