Type to search

Breaking News सार्वमत

डॉ. सुजय विखे व सदाशिव लोखंडे यांचा फलक फाडल्याने ‘रास्ता रोको’

Share

संगमनेर (प्रतिनिधी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याने नाशिक-पुणे महामार्गावर घुलेवाडी फाटा येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

पुणे-नाशिक महामार्गावरील घुलेवाडी येथे खा. डॉ. सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. हे फलक सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी फाडले. या घटनेचा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला. कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, पंचायत समिती सदस्य अशोक सातुपते, कैलास वाकचौरे, जयवंत पवार, लखन घोरपडे, राजश्री वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, निलेश पिडीयार, पुरूषोत्तम जोशी, बाळासाहेब राऊत, रवी गिरी, सोनाली गिरी, ललीत ढगे, मंदा राऊत यांच्यासह शिवसेना-भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलक फाडणार्‍यांचा पोलिसांनी शोध घेवून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी स्विकारले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!