वाशेरेच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या आशा वाकचौरे

0
अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाशेरे गावच्या सरपंचपदी आशा गोविंद वाकचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. मालती उत्तम गोडसे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी पी. के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यात वाकचौरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना ग्रामसेवक संगीता देशमुख, कामगार तलाठी मनीषा ढगे यांनी सहकार्य केले.
उद्योजक नितीन गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब गजे, माजी सरपंच मालती गोडसे, वाशेरे ग्रामविकास सार्वजनिक न्यास चे अध्यक्ष मोहन गजे आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच पदाकरिता राष्ट्रवादीच्या आशा वाकचौरे यांच्या नावाची सूचना सुलोचना वाकचौरे यांनी केली. माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, मधुकरराव नवले, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी.धुमाळ,
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सचिव यशवंतराव आभाळे, महिला आघाडी अध्यक्ष सौ. चंद्रकला धुमाळ, दूध संघाचे संचालक प्रवीण धुमाळ, युवाध्यक्ष शंभू नेहे, प्रवीण गोडसे आदींनी वाकचौरे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी शिवदास वाकचौरे, अनिल वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, किसन वाकचौरे, बबन वाकचौरे, अंबादास गजे, माधव वाकचौरे, राहुल गजे, शांताराम वाकचौरे, किसन शिरकांडे, बन्सी गजे, सोमनाथ गजे, ऋषिकेश गजे, साहेबराव गजे, विष्णू वाकचौरे, बाबूराव गजे, कामगार पो. पा. सतीश वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*