Type to search

सर्जेपुरा येथे दोन गटांत धुमश्‍चक्री

Featured सार्वमत

सर्जेपुरा येथे दोन गटांत धुमश्‍चक्री

Share
अहमदनगर (प्रतिनिधी) – सर्जेपुरा चौकात सायंकाळी दोन गटांत झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून दगडफेकीचा प्रकार घडला. सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. दगडफेकीनंतर पोलिसांनी तेथे धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला.

या परिसरातील आजी-माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांत हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. या गटातील मारामारीचे कारण किरकोळ असल्याचे समजते. पोलिसांनी या दगडफेकीची गंभीर दखल घेत सर्जेपुरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवला. सायंकाळी दगडफेक झाल्यामुळे परिसरात धावपळ उडाली. बाजारपेठेच्या जवळचा भाग असल्याने आणि सायंकाळची वेळ असल्याने या भागात गर्दी होती. अचानक दगडफेक होऊ लागल्याने वाहनचालक, पादचारी सुसाट निघाले. काही जण यात जखमी झाल्याचे समजते.

अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक एच. पी. मुलानी यांच्यासह शीघ्रकृती दलाची तुकडी सर्जेपुरा चौकात तैनात करण्यात आली. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून दगडफेक करणार्‍यांचा शोध सुरू केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे हा शोध घेतला जात आहे. या दगडफेकीमागे राजकीय वाद असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांची माहिती संकलित केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच दगडफेकीत जे आरोपी निष्पन्न झाले, त्यांची धरपकड सुरू करण्यात आली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!