Type to search

maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

वल्लभभाईंना तरी पटेल का? : राज ठाकरे

Share

मुंबई: देशात अनेक समस्या ‘आ’वासून उभ्या असताना २२९० कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारणं हे खुद्द वल्लभभाईंना तरी पटेल का असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून केला आहे. या नवीन व्यंगचित्रात त्यांनी मोदींच्या पटेल भक्तीवर ताशेरे ओढले आहेत

गुजरातमधील नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला असून हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार करण्यात आला असून नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०१३ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्मारकाचे आता लोकार्पण होणार आहे. या पुतळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावरुन राज ठाकरेंनी मंगळवारी व्यंगचित्रातून भाजपाला फटकारले.

या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी पटेलांच्या व्यंगचित्रासमोर हातात हार घेऊन उभे आहेत. त्यांच्यासोबत अमित शहा आणि इतर नेतेही उभे आहेत . पण ज्यांचा पुतळा उभारला जातोय ते पटेलच या पुतळ्याबद्दल नाखुश असल्याचं दिसतंय. स्वार्थी राजकारणासाठी हजारो कोटी खर्च करून माझा पुतळा उभा करण्यापेक्षा जिवंत माणसं जगवा असा सल्लाच ते मोदींना देत आहेत.

सरदार वल्लभभाई पटेलांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५मध्ये झाला होता. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!