नेतृत्व तुम्ही करा, श्रेयसुध्दा तुम्हीच घ्या पण सारसनगरला पाणी द्या : अ‍ॅड. राहुल रासकर

0

 भाजपचा वकील सेल बॅकफूटवर

अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगरच्या पाणी प्रश्‍नांवर पेटलेल्या राजकारणात भाजपचा वकिल सेल बॅक फुटवर गेला आहे. सारसनगरचे नेतृत्व तुम्ही करा, पाण्याचे श्रेयसुध्दा तुम्हीच घ्या पण सणासुदीच्या काळात सारसनगरकरांना वेठीस न धरता पाणी पुरवठा करा अशी भावनिक साद भाजप वकिल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश रासकर यांनी घातली आहे.
1999 मध्ये हद्दवाढीत सारसनगरचा भाग नगरपालिकेत समाविष्ट झाला. पुढे नगरपालिकेची महानगरपालिका झाली. सहनशील असलेले सारसनगरकर अजूनही सहनशीलच आहेच. समर्थनगर येथे पाणी टाकी बांधून सारसनगरचा पाणी प्रश्‍न सोडविला जाणार होता, पण त्या टाकीत अजून पाणी पडलेले नाही. उलट टँकर ठेकेदारावर महापालिकेने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली.
प्रभागातील एक नागरिक या नात्याने आपण हा प्रश्‍न हाती घेत त्यावर आवाज उठविला. आपले आंदोलन हे कोण्या राजकीय नेतृत्वाविरोधात नव्हते. प्रशासनाची उदासिनता व अकार्यक्षमतेविरोधात माझा लढा होता. राजकीय असुरक्षितेतून माझ्या आंदोलनाचा विपर्यास केला गेला अशी खंत रासकर यांनी व्यक्त केली आहे. सारसनगरमधील महिला पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने ऐकून आनंद झाली.
याच महिला 15 वर्षापूर्वी आंदोलनासाठी पुढे आल्या असत्या तर आज कदाचित सारसनगर टँकरमुक्त झाले असते. सारसनगरचे टँकर बंद होण्यामागी मी की तुम्ह हा वाद घालण्यापेक्षा (वाद घालण्याइतपत मी मोठाही नाही) नेतृत्व तुम्ही करा, श्रेय तुम्हीच घ्या पण सणासुदीच्या काळात सारसनगरला पाणी द्या अशी भावनिक साद अ‍ॅड. रासकर यांनी माध्यमांतून आमदार संग्राम जगताप यांना नामोल्लेख टाळून घातली आहे.

LEAVE A REPLY

*