Photo Gallery : सिनेतारकांची सारंगखेड्यात मांदियाळी

0

सारंगखेडा | प्रातिनिधी

बॉलिवूड तारे-तारकांनाही आता सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलची भुरळ पडली आहे. सर्वसामान्य अश्व शौकीनाप्रमाणे सिने-अभिनेते शेखर सुमन, अर्चना पुरण सिंग यांच्यासह सहकलाकारही आज सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलच्या प्रेमात पडले.

अभिनेता शेखर सुमन, अर्चना पुरणसिंग, अली फजल, परमित शेट्टी यांनी आज चेतक फेस्टिव्हलला भेट देत घोडे बाजाराची रेपेट केली.

चेतक फेस्टिव्हलमध्ये सुरु असलेल्या टेंट पेगिग स्पर्धेत सहभागी संघांच्या अश्व कसरती पाहिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ मलीनाथ कलशेट्टी उपस्थित होते.

दत्त जयंतीपासून देशातील सर्वात मोठ्या घोडेबाजाराला सारंगखेडा येथे सुरवात झाली आहे. या बाजाराला पर्यटन विभाग तीन वर्षापासून अश्व पर्यटन स्थळ म्हणून विकसित करीत आहे.

आज येथील चेतक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिनेअभिनेता अभिनेता शेखर सुमन, अर्चना पुरणसिंग, अली फजल, परमित शेट्टी यांचे आगमन झाले.

त्यांनी सर्वप्रथम जागरूक देवस्थान एकमुखी दत्त मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी चेतक फेस्टिव्हलमधील घोडेबाजाराला भेट देऊन घोड्याची पाहणी केली. या ठिकाणी सुरु असलेल्या टेंट पेगिंग स्पर्धाना हजेरी लावून अश्व कसरतीचा थरार अनुभवला.

पहिल्या या स्पर्धेत सहभागी सैन्य दल आणि इतर संघांनी धावत्या घोड्यावर स्वार होऊन तलवारीच्या सहाय्याने लिंबू आणि संत्रा कापला त्याच सोबत विविध क्रीडा प्रकार या ठिकाणी दाखविण्यात आले.

चेतक फेस्टिव्हल अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनाला त्यांनी भेट देऊन चित्रदालनाची पाहणी केली. त्यासोबतच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टेंट सिटीत काही काळ घालवून जलक्रीडा आणि नौका विहारचा आनंद लुटला.

चेतक फेस्टिव्हलमध्ये पर्यटनासाठी उभारण्यात आलेल्या विविध ठिकाणांना त्यांनी भेट दिली. चेतक फेस्टिव्हल समितीच्या व्यासपीठावर अभिनेता शेखर सुमन यांनी उपस्थित अश्वप्रेमी आणि भाविक यांच्याशी संवाद साधला.

पर्यटन विभाग चेतक फेस्टिव्हलची बांधणी करीत असून या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्थरावर नेण्यात यशस्वी झाला आहे. असून या फेस्टिव्हलला भेट देण्यासठी पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि इतर क्षेत्रातील मान्यवर येणार आहेत. मोठ्या प्रमाणात अशा फेस्टिव्हलच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळत असून अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

सारंगखेड्यातील घोड्यांचा थिल अनुभवण्यात वेगळीच मजा

ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात पर्यटनसाठी चालना मिळू शकते. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घोडे प्रथमच पाहिल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटात एखादा घोड्यावरील अभिनय करताना अनेक वेळा रिटेक घ्यावा लागतो. मात्र, या ठिकाणी घोड्याचा थिल अनुभवण्यात वेगळीच मजा असल्याची प्रतिक्रिया शेखर सुमन यांनी दिली. त्याच सोबत त्यांनी चेतक फेस्टिव्हल समिती आणि पर्यटन विभागाचे आयोजना संदर्भात कौतुक केले.

शेखर सुमन सिने अभिनेता

हिवाळी पर्यटनासाठी नागरिक बाहेर देशात किवा पर्यटन स्थळावर जातात. मात्र सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल आणि या ठिकाणी उभारण्यात आलेली टेंट सिटी आणि घोडे बाजार या ठिकाणी होणाऱ्या विविध घोड्याचा स्पर्धाही पर्यटकांसाठी पर्वणी असेल. त्यामुळे पुढील वर्षी सर्वांनी चेतक फेस्टिव्हलला भेट द्यावी. मी सुद्धा पुढील वर्षी चेतक फेस्टिव्हलसाठी येणार आहे अशी प्रतिक्रिया अभिनेता अली फजल यांनी दिली.

अभिनेता अली फजल

पर्यटन विभाग आणि चेतक फेस्टिव्हल च्या माध्यमातून याठिकाणी पर्यटन विकास होत आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटकांना एक नवीन ठिकाण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना एक वेगळी अनुभुती याठिकाणी मिळते असं अर्चना पुरणसिंग यांनी म्हटले.

अर्चना पुरणसिंग अभिनेत्री

LEAVE A REPLY

*