सराला बेटाला 17 एकर जमीन दान

0
अस्तगाव (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील कै. निवृत्ती बळवंतराव सालपुरे यांच्या स्मरणार्थ साडेसतरा एकर जमीन सराला बेटाला दान करण्यात आली आहे. सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरीजी महाराज यांनी या जमिनीचा उतारा सोमेश्‍वर संस्थान पिंपळवाडी व ट्रस्टी गं. भा. जनाबाई निवृत्ती सालपुरे यांचे हस्ते स्विकारला.
पिंपळवाडी येथील कै. निवृत्ती बळवंतराव सालपुरे हे सराला बेटाचे निस्सीम भक्त होते. भगवान सोमेश्‍वरावर त्यांची नितांत श्रध्दा होती. ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज कै. सालपुरे यांच्या कडे कायम येत असत. सालपुरे कुटूंबियांनी साडेसतरा एकर जमिन सराला बेटाला दान केली आहे.
यावेळी सोमेश्‍वर संस्थानचे ट्रस्टी रामनाथ एकनाथ ठोंबरे, संपत मुरलीधर दिघे, गं. भा. जनाबाई निवृत्ती सालपुरे यांचेसह माजी खासदार भाउसाहेब वाक्चौरे, शिर्डीच्या नगरसेविका. अर्चनाताई कोते, बद्रीनाथ महाराज बारहाते, मधुकर महाराज अदिंसह ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी किर्तनात बोलतांना महंत रामगिरी महाराज म्हणाले, गाव आणि सोमेश्‍वर संस्थान यामधील दरी कमी करा, सालपुरे कुटूंबियांनी धारिष्ठ दान केले. भगवंतासाठी दान केले. या संस्थानचा कायापालट करण्यासाठी गावाने, पंचक्रोशीने सहकार्य करावे.
संत तुकाराम महाराजांच्या पिकलिया शेंध कडू पण गेले। तैसे आम्हा केले पांडुरंगे॥ हा अभंग निरुपणासाठी महाराजांनी त्यावर किर्तन केले. शेंधाडाचा दृष्टांत महाराजांनी सांगितला. मानवी जीवनाचा परिपक्वतेचा सिध्दांत मांडला.
माणसाच्या जिवनात काम, क्रोध, लोभ रुपी असणारा कडवटपणा हा भगवंताच्या चिंतनाच्या माध्यमातुन नष्ट होतो. या कार्यक्रमाचे नियोजन सोमेश्‍वर संस्थानचे मठाधिपती गणेश महाराज यांनी केले.
यावेळी कै. निवृत्ती बळवंत सालपुरे यांचा जिवनपट यावेळी भाविकांना कथन करण्यात आला. शेवटी सरपंच जालिंदर तुरकणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*