सारा अली खान झळकणार बिग बजेट सिनेमात

0

मुंबई : सारा अली खान अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे.

बाप-मुलीच्या नात्यावर आधारित नितिन कक्कडचा हा चित्रपट असून सैफसोबत या चित्रपटात साराला कास्ट करण्याचा विचार सध्या सुरु आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून बाप-मुलीच्या नात्याभवती फिरणारी चित्रपटाची कथा आहे. एक खास संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे. चित्रपटातील सैफच्या मुलीच्या भूमिकेसाठी नितिनने साराला अप्रोच केले आहे. दोघांनाही चित्रपटाची कथा खूप आवडली असल्यामुळे सैफ आणि सारा यात बाप-लेकीच्या भूमिकेत दिसू शकतात.

LEAVE A REPLY

*