Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसप्तशृंगी गडावरील चैत्र महिन्यातील यात्रोत्सव रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त व ग्रामस्थांचा निर्णय

सप्तशृंगी गडावरील चैत्र महिन्यातील यात्रोत्सव रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त व ग्रामस्थांचा निर्णय

सप्तशृंगीगड | वार्ताहर

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात सुमारे ११४ देशामध्ये १.२५ लाख लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. तर भरतात देशामध्ये १०५ व महाराष्ट्रामध्ये ३३ लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. यापार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आणि कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

आज सप्तशृंगी गडावर प्रांतअधिकारी डॉ पंकज आशिया व तसेच पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, देवस्थान विश्वस्त यांचा मार्गदर्शनाखाली ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, रोपवे व्यवस्थापक राजीव लूम्बा व तसेच प्रशासन अधिकारी यांच्यासह सप्तशृंगी ग्रामस्थ यांच्यात आज बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

शासनाने नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेश यैपर्यंत परवानगी देण्यात येऊ नये असे निर्देश दिलेले आहेत.

त्यामुळे श्री सप्तशृंगी निवासनी देवीची चैत्र उत्सव २०२० यात्रा यात्रा २ एप्रिल २०२० ते ८ एप्रिल २०२० या कालावधीमध्ये सालाबादप्रमाणे नियोजीत करण्यात आली होती.

दरम्यान नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व इतर राज्यातून सुमारे ७ ते ८ लाख भाविक श्री भगवती दर्शनाला दरवर्षी येतात. मात्र, यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, विश्वस्त संस्था व ग्रामपंचायत सप्तशृंगीगड /नांदुरी यांच्या वतीने संयुक्क्तिकरित्या निर्णय घेत चैत्र उत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या