Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सप्तश्रुंगीगड : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा आढावा

Share

इम्रान शाहा | सप्तश्रुंगीगड

सप्तश्रुंगीगडावर नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज  सप्तश्रुंगीगडावर पाहणी करून आढावा घेण्यात आला.

नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रुंगीगडावर भव्य यात्रा असते. हजारोंच्या संख्येने पर्यटक याकाळात सप्तश्रुंगीचरणी लिन होतात. फ्युनिक्युलर ट्रोलीची व्यवस्था, भाविकांच्या गर्दीचे नियोजन, मनुष्यबळ आणि भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा याबाबत चर्चा झाली.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी प्रारंभ होणाऱ्या नवरात्री उत्सवात वेगवेगळया अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली. यामध्ये बस स्थानक, रोपवे, ट्रस्ट, वीज वितरक, ग्रामपंचायत, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासनाचे नियोजन या विषयांवर चर्चा झाली.

वणी परिसरात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे गडावर पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे यादृष्टीने प्रशासनास नियोजन करून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पायी गड गाठणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच मदतकार्यालासाठी एक कायमस्वरूपी नंबर देण्याचाही विचार असल्याचे मांढरे म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!