Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सप्तशृंगी गडावर उद्यापासून दर्शन बंद; लाईव्ह दर्शन सुरु राहील

Share

नाशिक | प्रतिनिधी 

साडेतीन शक्तीपीठापैंकी अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील दर्शन उद्यापासून पूर्णपणे बंद ठेन्व्यात येणार आहे. याबाबतची माहिती आज ग्रामस्थ, ट्रस्टच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

काल (दि १६) ला जिल्हा प्रशासन, सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान, सप्तशृंगीगडावरील प्रसिद्ध चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आला. यानंतर आज संयुक्त बैठक घेऊन कोरोना व्हायरसचा वाढलेला शिरकाव लक्षात घेता भाविकांसाठी दर्शन उद्यापासून पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, याकाळात नियमित विधिवत पूजा अर्चा पार पडणार असून भाविकांना संकेतस्थळावर लाईव्ह दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

गडावर येणाऱ्या भाविकांना प्रसादालय तसेच गडावर भाविकांना राहण्यासाठीची जी व्यवस्था आहे तीदेखील पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच फ्युनीक्युलर ट्रोलीदेखील बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोना या व्हायरसपासून वाचण्यासाठी ट्रस्ट तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता मास्क व सनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शासनाच्या आदेशानुसार येत्या ३१ मार्च पर्यंत पुढील दर्शन बंद असेल मात्र जर कोरोनाचा शिरकाव अधिक वाढला तर शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वान ठेऊ नये असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले असून सर्दी, खोकला, घसा तसेच ताप आला असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!