सप्तश्रृंगी मंदिर आज झाले दर्शनासाठी खुले

0

सप्तश्रृंग गड (वार्ताहर)| सप्तश्रृंगी गडावर बसवण्यात आलेल्या संरक्षण जाळीमध्ये दरड कोसळून मोठ्या आकाराचा दगड अडकला होता.

हा दगड काढण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते. त्यामूळे गडावरचे दर्शन भाविकांसाठी 21 जूनपासून बंद करण्यात आले होते.

जाळीत अडकलेल्या दगडाचे वजन जवळपास अडिच टनपेक्षा जास्त होते. दरम्यान, जाळी बसवलेल्या कंपनीच्या अभियंत्यांकडून दगड काढण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. दगड काढण्याचे काम पुर्ण झाले असून आजपासून (दि.25) मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

मंदिर पहाटे साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*