शक्तीपीठ सप्तश्रृंगगडावर भगवतीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ

0

वणी (प्रतिनिधी) ता. २१ : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तश्रृंग गडावर शारदीय नवरात्रौत्सवाला आज उत्साहात प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी दर्शनाला सुमारे चाळीस हजार भाविकांनी हजेरी लावली.

अर्धे शक्तीपीठ श्री आदिशक्ती सप्तशृंग मातेच्या नवराञोउत्सवात सकाळी ७.०० वा न्यासाच्या कार्यालयातून अलंकाराची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. सकाळी ८.०० वा देवी मातेची महापुजा व घटस्थापना मंञघोषात प्रमुख जिल्हा न्यायधीश डॉ सुर्यकांत शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. मंदिरातील गाभारा विविध फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्याचे वातावरण प्रसन्न् होते.

सप्तशृंगी देवी अलंकाराचे विधीवत पूजन करून जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ सुर्यकांत सुर्यवंशी यांनी (सह पत्नी )व जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा न्यासाचे अध्यक्ष श्रीमती यू. एन नंदेश्वर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी विश्वस्त डॉ रावसाहेब शिंदे, विश्वस्त राजेंद्र सुर्यवंशी , व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे व न्यासाचे सर्वच कर्मचारी व अधिकारी,आदी उपस्थित होते.

श्री आई भगवतीस पंचामृत महापुजा करुन दुपारी १२.०० वा महानैवेद्य आरती करण्यात आली. आज पहिली माळ असल्याने बाहेरगावी ज्योत घेवून जाणारे भांविकांनी दर्शन घेतले.

पायऱ्यांवर  बाऱ्या लावून भाविकांना टप्याटप्याने मंदिरात सोडण्यात येत होते. प्रवेश द्वाराजवळ न्यासाने नारळ फोडण्याची स्वंतञ व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांना मेटल डिटेक्टर मधून तपासणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*