माजी केंद्रीय मंत्री सांवरलाल जाट यांचे निधन

0

माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सांवरलाल जाट यांचं आज (बुधवार) सकाळी निधन झालं. सांवरलाल जाट काही दिवसांपासून आजार होते आणि त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

सांवरलाल जाट मोदी सरकारमध्ये जलसंवर्धन राज्यमंत्री होते. ते 62 वर्षांचे होते.

22 जुलै रोजी जयपूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालली बैठकीत सांवरलाल जाट बेशुद्ध पडले होते.

प्रकृती बिघडल्यामुळे तातडीने अॅम्बुलन्स बोलावण्यात आली. त्यानंतर सांवरलाल जाट यांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

सांवरलाल जाट हे अजमेरमधून लोकसभा खासदार होते. मोदी सरकार ते जलसंवर्धन राज्यमंत्रीही होते. 9 नोव्हेंबर 2014 पासून 5 जुलै 2016 पर्यंत त्यांनी जलसंवर्धन राज्यमंत्री म्हणून केंद्रात काम केलं.

LEAVE A REPLY

*