हस्तलिखीत ज्ञानेश्वरी पूर्ण करणारा कलाशिक्षक संतोष क्षिरसागर!

0

पारनेर (प्रतिनिधी) – हस्तलिखीत ज्ञानेश्वरी अवघ्या अडीच वर्षामध्ये पूर्ण करण्याचा मानस पारनेर तालुक्यातील वासुंदे गावचे संतोष पांडुरंग क्षिरसागर या ध्येयवेड्या कलाशिक्षकाने 9 हजार ओव्यांसह 18 वा अध्याय 15 आँगस्ट 2017 अखेर पुर्णत्वाकडे जात आहे.

संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लिखान सच्चिदानंद बाबा यांनी केले होते. महाराष्ट्राच्या ख्यातनाम संतांमध्ये ज्यांची सर्वदूर ओळख आहे असे डॉ.नारायण महाराज जाधव यांच्या प्रेरणा घेवून 31 मार्च 2015 रोजी नेवासा येथे एकादशीच्या दिवशी पैस खांबाला टेकून हस्तलिखीत ज्ञानेश्वरीचे लिखाण चालू केले. दररोज 20 ते 25 ओव्यांचे लिखाण करत 17 वा अध्याय पूर्ण करून 18 व्या अध्यायातील 1810 ओव्यांपैकी आजमितीस 1100 ओव्या पूर्ण करत ज्ञानेश्वरी ग्रंथ पुर्णत्वाकडे आहे.

संत निळोबारायांचे शिष्य असणार्‍या पारनेर तालुक्यातील भाऊसाहेब महारांजांची जन्मभूमी वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेत कलाशिक्षक संतोष क्षिरसागर हे गावातीलच जालिंदर वाबळे व मधूकर बर्वे यांच्यासमवेत आळंदी येथे डॉ. नारायण महाराज जाधव यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी गेले असता पत्रिकेवरील हस्ताक्षर पाहून महाराजांनी हस्तलिखीत ज्ञानेश्वरी लिहीण्याची सुचना केली. प्रारंभी होकार देण्याचे धाडस करणे संतोष क्षिरसागर यांना अवघड वाटले. परंतू डॉ.नारायण महाराज जाधव यांची आज्ञा समजून हे आव्हान पेलले. ज्ञानेश्वरीतील ओव्यांची संख्या पाहता हे काम रोज जरी केले तरी ते पूर्ण करायला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार होता. परंतू महाराजांच्या आग्रहास्तव हे काम त्यांनी स्विकारले.हस्ताक्षरात सार्थ ज्ञानेश्वरी लिहीणे किती चांगले आहे हे जाधव महाराज यांनी पटवून दिले.

डॉ.नारायण महाराज जाधव हे दोन तीन वर्षातून वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित करीत असतात. परंतू त्यांनी यावेळेला अशाप्रकारे हस्तलिखीत ग्रंथ तयार झाल्यानंतरच त्याच अक्षरातील ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराजांच्या आर्शिवादाने क्षिरसागर यांनी स्वताची नोकरी सांभाळत पार्कर कंपनीच्या कटनिपच्या शाईपेनने ग्रंथ लिखानाचे काम एकादशीच्या दिवशी 31 मार्च 2015 ला नेवासा येथे पैस खांबाला टेकून प्रारंभ केला. दररोज पहाटे किमान दोन ते अडीच तास लिखाण करून 15 ऑगस्ट 2017 अखेर पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे.
15 व्या शतकात हा ज्ञानेश्वरी ग्रंथ एकनाथ महाराजांनी भाद्रपद षष्ठीला पूर्ण केला. त्यामुळे गोदावरी काठी पैठण येथे 11 सप्टेंबर 2017 रोजी भाद्रपद षष्ठीला ज्ञानेश्वरी जयंतीचे औचित्य साधून डॉ.नारायण महाराज यांच्या हस्ते माऊली चरणी अर्पण होत आहे.

LEAVE A REPLY

*