Video : संत सखाराम महाराज पालखी मिरवणुकीत अभूतपूर्व उत्साह; हजारो भाविकांची उपस्थिती

0
अमळनेर (राजेंद्र पोतदार) | संत सखाराम महाराजाच्या  जयघोषात  यात्रोत्सवातील पालखी मिरवणूक सोहळा  आज (दि. ३०) रोजी ऊत्साहात सूरू झाला. पहाटे ६ वाजता वाडी संस्थानापासून निघालेली मिरवणूक रात्री ऊशिरा पर्यंत ठिकाणावर पोहचेल. यावेळी हजारो भविकांनी हजेरी असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सजविलेल्या पालखीचा मेण्यात लालजींची ऊत्सव मूर्ती स.६ वाजता ठेवण्यात आली. देव परिवाराकडून पूजा करण्यात आली. पालखीचा मेणा वाहून नेण्याची जबाबदारी परंपरेप्रमाणे भोई समाजाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडले. बबली पाठक, किरण सावंत, पंकज चौधरी, सलीम शेख, किरण बागूल आदी पदाधिकारी होते. तर शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी मूस्लीम समाजाचे पदाधिकारी यांचाही सहभाग होता.

१५ तास ही मिरवणूक चालते. पालखी सोहळ्याला खान्देशातून हजारो भाविकांनी हजेरी लावली. वाडी संस्थानातील मंदिरातील लालजींची ऊत्सव मूर्ती पहाटे विधिवत पूजा करून सजविलेल्या पालखीच्या मेण्यात ठेवण्यात आली. परंपरेने पहाटे ६ वाजता हि मिरवणूक वाडीपासून निघाली. तेथून राजहोळी चौकातून पानखिडकी ,जवळ दूपारी १२ वाजता पोहोचली.

येथून शहरातील लेझीम ढोल वाद्य सहभागी झाले होते. सराफ बाजार मार्गे दगडी दरवाजा, फर्शी पूलावरून, पैलाड मार्गे, पून्हा बोरी पात्रात रात्री  ९ वाजेपर्यंत पोहचेल.

त्यानंतर कसाली मोहल्यातून वाडीजवळ १० वाजेच्या सूमारास पोहचून सांगता होते. अत्यंत चिंचोळ्या गल्लीतून ही मिरवणूक जाते. तरीही हजारो स्त्रि पूरूष भाविकांनी शांततेत दर्शन घेतले सूमारे १५ तास ही मिरवणूक ढोल ताश्यांच्या गजरात मूखी हरिनाम जपत वारकऱ्यांच्या व भजनी मंडळाच्या ऊपस्थीतीत पार पडली.

शहरातील बहूतांश लेझीम मंडळांसह भूसावळ रेल्वे विभागाचे बँड पथक मानाच्या नारळावर  या मिरवणूकीत परंपरेनूसार सहभागी झाले होते. वैशाख वणव्याच्या रणरणत्या ऊन्हात पालखीच्या मागे सखाराम महाराज संस्थानचे गाधीपती प्रसाद महाराज अनवाणी चालून भविकांना आशीर्वाद  देत होते.

ऊत्सवाच्या काळात साक्षात पांडूरंगाचे याठिकाणी वास्तव्य असते असा समज भक्तांमध्ये आहे त्यामूळे या सोहळ्याला धार्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्व आहे आज रात्री ऊशिरा पर्यंत बोरी पात्रात ग्रामिण भागातील भविकांची गर्दी वाढते

पानसूपारी कार्यक्रम : पालखी मार्गात  २५० हून अधिक ठिकाणी प्रसाद महाराज भेटी देवून पान सूपारी चा कार्यक्रम करतात महाराजांना विशेष बंदूकधारी सूरक्षा पोलीस संरक्षण देण्यात आले होते. दगडी दरवाजा पर्यंत व्यापाऱ्यांनी सावली साठी पालखी मार्गात मंडप टाकले होते. त्यामूळे ऊन्हाचे चटके जाणवत नव्हते, मात्र भर दूपारी ३ वाजे नंतर पालखी फर्शी पूलावरून जाते. त्यावेळी ऊन्हाचे चटके असह्य होतात पालखीचे पूढे ब्राम्हण समाजाचे महिला मंडळाचे ढोल पथक मोहन महाराज बेलापूरकर यांची दिंडी पथक भूसावळ रेल्वेचे बँड पथक तसेच शहरातील विविध व्यायाम शाळेचे ढोल लेझीम पथक वाजंत्री वाद्य सहभागी झाले आहेत.

मोफत अन्नदान : पालखी मार्गात भाविकांसाठी अनेक सेवाभावी संस्थांनी पूढाकार घेत खिचडी, पोहे ,झूणका भाकर शिरा, साबूदाणे ,केळी,यासह सरबत ,ताक, थंडपाण्याची ,मोफत व्यवस्था केली होती. पोलीस विभागातर्फे स्वतः पोलीस निरीक्षण अनिल बडगूजर सहकारी पोलीस कर्मचारी तालूक्यातील पोलीस पाटील होमगार्ड तालूका समादेशक अरूण नेरकर महिला पोलीस होमगार्ड यानी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

गूलाल ऊधळून महाराजांचे नृत्य : पालखी सोहळा ऊत्साहात पार पडल्यानंतर रात्री बोरी पात्रातील सखाराम महाराज समाधी स्थळा जवळ परंपरेनूसार गूलालाचा कार्यक्रम करतात यावेळी महाराज फूलांचे पैंजण घालून आनंदात बेधूंद होवून नाचतात गूलाल ऊधळल्या नंतर ऊद्या (दि १) ला वाडी मंदिराजवळ मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होईल.

श्री संत सखाराम महाराज पालखीत सकाळी सुर्योदयाचे वेळी श्री लालजीची मूर्ती ढाल तलवार धारण करुन पालखीतून काढण्यात आली. त्यामागे  संत सखाराम महाराजांच्या पादुका छोट्या रथातुन परंपरेनूसार ठेवण्यात आल्या होत्या.

प.पु.प्रसाद महाराज पादुकांच्या पाठोपाठ होते. सुर्योस्ताला रात्री ९वाजता  पालखी वाळवंटात समाधी समोर पोहचेल. तेथे श्री धरणगावकर यांचे परंपरेचे कीर्तन होते. महाराजांच्या हस्ते सर्व सेवेकऱ्यांना मानाचे श्रीफळ देण्यात येते. नंतर ऊत्सव  मूर्ती वाजत गाजत वाडी मंदिरात आणली जाते.

उत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याचा आनंद म्हणून भक्तजणांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करतात . यावेळी प्रसाद महाराज पायात फूलांचे पैंजण घालून बेधूंद होत नृत्य करीत सेवेकरी व भाविकांचे अंगावर गूलालाची ऊधळण करीत आनंदोत्सव साजरा करतात.

पालखी मार्गावर १२ ते १५ सीसीटीव्ही कँमेरे लावण्यात आले सर्व हालचाली टिपण्यास मदत झाली बोरी नदीच्या पात्रात यात्रेच्या ठिकाणी १२ ते १५ सीसीटिव्ही कँमेरे लावण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*