संत राजिंदर सिंह महाराजांचा मिस्कीन मळ्यात प्रवचन सोहळा

0

अहमदनगर (प्रतिनिधी) –विश्व विख्यात आध्यात्मिक संत राजिंदर सिंह महाराज यांचे मिस्कान नगर, तारकपूर येथे दि. 3 व 4 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती कृपाल आश्रमाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान मंगळवार दि.3 रोजी सायंकाळी 7 वा. प्रवचन व सत्यंग, बुधवार (दि.4) रोजी सायंकाळी प्रवचन, सत्संग, व रात्री 9 वा. अनुग्रह दिक्षा (नामदान) असे दोन दिवसीय कार्यक्रम साठी संत राजिंदर सिंह जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
प्रवचन व नामदान स्वतः संत राजिंदर सिंह महाराज हे दिक्षा देणार आहे. यात समर्थ सदगुरू, अनुग्रहाच्या वेळी अंतरी असलेल्या प्रभुच्या ईश्वराच्या ज्योति आणि श्रुती यांच्याशी जोडून त्यांचा व्यक्तीगत अनुभव शब्दाच्या योगाने करून या वेळीदिले जाणार आहे. तसेच ही दिक्षा व अनुग्रह या सर्वांनसाठी मोफत दिली जाणार आहे. यावेळी धार्मिक ध्यान केंद्रीत करण्याचा विधी या ठिकाणी सांगितला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी तारपूर परिसरातील मिस्कीन मळा येथे भव्य मंडप टाकण्यात आला असून या ठिकाणी एकाच वेळी 50 ते 60 हजार भाविंक एकाच वेळी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या सर्व भक्तासाठी या ठिकाणी प्रसदाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कृपाल आश्रमाच्या माध्यमातून चालणार्‍या विविध उपक्रमाची माहिती देणारे स्टॅल, साहित्य, धार्मिक पुस्तके यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी बाहेराच्या जिल्ह्यातून येणार्‍या भाविकासाठी या ठिकाणी राहण्याची व जेवण्याची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तरी सर्व नगराकरांनी या प्रचवन व नामदान (दिक्षा) या कार्यक्रमास मोठ्या संख्याने उपस्थितीत राहवे असे आवहान कृपाल आश्राच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*