Friday, May 3, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रा रद्द

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रा रद्द

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध असलेली संत निवृत्तीनाथ यात्रा अखेर रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर काल बैठक घेण्यात आली. त्यामध्ये करोना महामारीमुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

या बैठकीला प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, प्रशासन अधिकारी व स्थानिक नगरपालिका प्रतिनिधी आदी उपस्थित होते. फेब्रुवारीतील सात तारखेला हि यात्रा नियोजित होती. परंतु करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसल्याने हा निर्णय घेतलाआला. दरवर्षी लाखो भाविक, वारकरी त्र्यंबक नगरीत येतात. हजारो दिंड्या पायियो चालत संत निवृत्तिनाथांच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु यंदा करोना महामारीमुळे यंदाचॆ यात्रा रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान या बैठकीद्वारे येणाऱ्या दिंडीचालकांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. यात्रेच्या दिवशी परंपरेने महापूजा करण्यात येणार आहे.

यात्रा बाबतचा अंतिम आदेश जिल्हाधिकारी यांना बैठकीचा अहवाल पाठवून काढला जाईल असे प्रांत अधिकारी म्हणाले. बैठकीस तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, नगरपालिका मुख्याधिकारी संजय जाधव, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्निल शेलार, संत निवृत्तीनाथ मंदिर अध्यक्ष पवनकुमार भुतडा, तसेच मंदिर पुजारी योगीराज गोसावी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या