Video : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीची ‘ही’ माहिती तुम्हाला असायलाच हवी

0
त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे) | आज निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाने पंढरपूरकडे प्रयाण केले. या पालखीची विशेषत: अशी आहे.  15  हजार वारकरी निवृत्तीनाथ  पालखी दिंडीत सामील झाले आहेत.
मंदिरापासून निघालेल्या दिंडीचे स्वागत नगरपालिकेकडून करण्यात आले. नाथांच्या पादुका व मूर्तीची कुशावर्तावर पुजा झाली. या वेळी मंदिर पुजारी जयंत गोसावी, अध्यक्ष संजय धोंडगे नगराध्यक्ष विजया लड्डा यांच्या हस्ते महापूजा झाली.

असा आहे पालखीचा प्रवास

पालखीला पोहोचण्यासाठी 26 दिवस लागतात. यामध्ये मुक्कामाचे 4 दिवस असे तीस दिवस. त्यानंतर परतीचा प्रवास 18 दिवस असे एकूण ४८ दिवसांचा प्रवास असतो. 4 जुलै पंढरपूर यात्रा वारी आहे एक दिवस आधीच म्हणजे 3 जुलैला पालखी पंढरपूर गाठेल.

 

LEAVE A REPLY

*