ऑस्ट्रेलियामध्ये ‘संजू’ने ‘बाहुबली २’च्या कमाईचा विक्रम मोडला

0
मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ या सिनेमाने बॉलिवूड बॉक्स ऑफीसचे बरेच विक्रम मोडले आहे. तसेच अद्यापही सिनेमाची घोडदौड सुरूच आहे. हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये सिनेमांमध्ये तिसऱ्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे ‘बाहुबली २’ या चित्रपटाला मागे टाकत ‘संजू’ने बक्कळ कमाई केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबद्दलची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ‘संजू’ने ‘बाहुबली २’च्या (हिंदी) कमाईचा विक्रम मोडला आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने ऑस्ट्रेलियात सुमारे १२ कोटी २१ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ‘बाहुबली २’ने सुमारे १२ कोटी २० लाख रुपये कमावले होते.

सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा…
हिंदी सिनेमाच्या इतिहासात एका दिवसात एवढी कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे. 2018 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘संजू’ने सलमान खानचा ‘रेस 3’, टायगर श्रॉफचा ‘बागी 2’ आणि दीपिका-रणवीरच्या ‘पद्मावत’ या सिनेमांना अगोदरच मागे टाकलं होतं.

LEAVE A REPLY

*