#CBFC : संसदीय समितीसमोर हजर होणार संजय लीला भन्साळी आणि प्रसून जोशी

0

वादाच्या भोवऱ्यात अडकेलेल्या पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी आज संसदीय समितीसमोर हजर होणार आहेत.

संसदेच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्ड (सीबीएफसी) यांचे अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहे.

चित्तोडगडचे खासदार सी. पी. जोशी यांनी संसदीय समितीसमोर ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. समितीने त्याची दखल घेत भन्साळी यांना समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

आज भन्साळी हे संसंदीय समितीसमोर हजर होतील, सेंसॉर बोर्डचे व माहिती व प्रसारण मंत्रालयाच्याही प्रतिनिधींना त्यावेळी उपस्थित राहण्याचे आदेश या समितीने दिले आहेत. कारण, पद्मावती प्रकरणी आजपर्यंत कोणती कारवाई केली आहे. हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे.

संसदीय समितीसमोरील सुनावणीनंतर भन्साळी व सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान च्या स्थायी समितीसमोर हजर व्हायचे आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकुर हे असतील. भन्साळी या ठिकाणी चित्रपट विषयक आपली बाजू मांडतील. अभिनेते परेश रावल आणि राज बब्बर यांचा या समितीमध्ये सहभाग असेल.

LEAVE A REPLY

*