संजय दत्तच्या बायकोचा स्विमिंग पूलमध्‍ये बोल्ड अंदाज

0

मुंबई : गेल्‍या आठवड्‍यात संजय दत्त त्‍याची पत्नी मान्यता दत्त आणि दोन्‍ही मुलांसोबत त्‍याचा बेस्ट फ्रेंड परेश घलानीसोबत सिंगापुरमध्‍ये व्‍हेकेशनसाठी चित्रपटांपासून ब्रेक घेतल्‍याचं वृत्त होतं. संजय दत्त आता त्‍याचा आगामी चित्रपट ‘प्रस्थानम’चे शूटिंग करत आहे. संजयने कामातून ब्रेक घेण्‍यासाठी फॅमिली आणि मित्रासोबत व्‍हेकेशनला गेला होता. व्‍हेकेशन एन्‍जॉय करताना मान्यता दत्तने आपल्‍या मुलांसोबत खुप मस्ती केली. त्‍याची एक झलक तिने तिच्‍या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर दाखवली आहे.

मान्यता कुटुंबासोबत सिंगापूरच्या काही खास ठिकाणी आउटिंग करताना दिसत आहे. आधीही मान्यताने अनेक ठिकाणचे स्विमींग करतानाचे फोटो शेअर केले आहेत. मान्यताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर संजय दत्तला किस करतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. सिंगापूमध्ये मान्यताने तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. पण असे बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे संजय दत्त अनेकदा मान्यताला ओरडला असल्यामुळे आता या सिंगापूरच्या बोल्ड फोटोंमुळे मान्यता पुन्हा ओरडा खाणार का ? पण सोशल मीडियावर मान्यताचा बोल्ड अंदाज काही औरच आहे.

LEAVE A REPLY

*