Friday, May 3, 2024
Homeनाशिकजि.प. निविदा प्रक्रिया राजकीय दबावाखाली

जि.प. निविदा प्रक्रिया राजकीय दबावाखाली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद मुख्यलायतील स्वच्छता निविदा प्रक्रीया राजकीय दबावाखाली राबविली गेल्याचा आरोप स्थायी समिती बैठकीत भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केला. संबंधित कंत्राटदाराचे अपूर्ण कागदपत्रे असताना त्यास कंत्राट देण्यात आल्याचे त्यांनी सभेच्या निर्देशनास आणून दिले.वर्षानुवर्ष एकाच ठेकेदारास हे कंत्राट कसे मिळते ? असर्व मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनाची भूमिकेवरच संशय व्यक्त केला.यावर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी निविदा प्रक्रीयेची चौकशी करूनच कंत्राटदार अंतिम केला जाईल,असे स्पष्ट केले.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठक गुरुवारी ( दि१७)अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या निविदा प्रक्रीयेत राजकीय दबाव झुगारून प्रशासनाने पारदर्शकपणे प्रक्रीया पार पाडलेली असताना मुख्यलायतील स्वच्छता निविदा प्रक्रीया राजकीय दबावाखाली राबविली गेल्याचा आरोप डॉ. कुंभार्डे यांनी केला.इमारत देखाभाल-दुरूस्ती (स्वच्छता) निविदेबाबत प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तीन महिन्यांपूर्वी या कामांची निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. ती रद्द का केली अशी विचारणाही केली. त्यावर कार्यकारी अभियंता दादाजी गांगुर्डे यांनी करोनामुळे कमी निविदा प्राप्त झाल्याचे सांगितले.

निविदा प्राप्त झाल्या होत्या.मात्र, संबंधित कंत्राटदारास कंत्राट मिळावा. यासाठी राजकीय दबाब होता. परंतू ,संबंधित कंत्राटदाराचे कागदपत्रे नसल्याने ही निविदा प्रक्रीया रद्द केल्याचे डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले. आताही संबंधित कंत्राटदार तसेच इतर कंत्राटदारांचे कागदपत्रांची अपूर्णता असताना निविदा उघडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या निविदेबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने ही निविदा प्रक्रीया रद्द करावी,अशी मागणी डॉ. कुंभार्डे यांनी केली.

दहा वर्षांपासून एकाच कंत्राटदारास कंत्राट का देण्यात येत आहे.अन्य कोणीही निविदा भरत नाही का ? असे प्रश्नही सदस्यांनी यावेळी उपस्थित केले. त्यावर चुकीची निविदा प्रक्रीया राबविली जाणार नाही. प्रक्रीयेत त्रुटी असल्यास त्यांची सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतरच निविदा अंतिम करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी दिले.यामुळे निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या