Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

शोहेब मलिकच्या निवृत्तीनंतर काय म्हणाली सानिया मिर्जा?

Share

लंडन | वृत्तसंस्था 

पाकिस्तानचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू शोहेब मलिकने आज लंडनमध्ये क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. लंडनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्याने याबाबत घोषणा केली.

त्याच्या घोषणेनंतर पत्नी सानिया मिर्जा हिने भावनिक पोस्टचे ट्वीट अपडेट करत त्याने घेतलेल्या निर्णयाला पाठींबा दिला आहे. ती म्हणाली की, कुठल्याही गोष्टीला शेवट असतोच परंतु प्रत्येक शेवट म्हणजे नव्याची सुरुवात असते. शोहेब मलिक तुम्ही आपल्या आयुष्यातील २० वर्षे आपल्या देशासाठी खेळलात याचा गर्व आहे. आपल्याला मिळालेल्या आतापर्यंतचा सन्मान आणि विनम्रतेने स्वीकारून तुम्ही आजचा हा निर्णय घेतला आहे. आपल्या निर्णयाचे इज़हान आणि मला सार्थ अभिमान आहे.

पाकिस्तान यंदाच्या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. शोहेब मलिक यंदाच्या विश्वचषकात तीन सामने खेळला. तिन्हीही सामन्यात त्याची कामगिरी सर्वसाधारण राहिली. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका केली जात होती. ३७ वर्षीय शोहेब मलिक ने आज क्रिकेटमधून संन्यास घेत असलायचे जाहीर केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!