Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आ. जगतापांच्या सेना प्रवेशाला पुन्हा उकळी

Share
महापालिकेतील रिक्त पदे भरतीसाठी मंजुरी घेणार : आ. संग्राम जगताप, Latest News Mla Jagtap Statement Amc Post Recruitment Ahmednagar

आ. जगतापांचे कानावर हात || राष्ट्रवादीकडूनच लढण्याचा दावा

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आ. संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगू लागली आहे. केवळ चर्चाच नव्हे, तर काहीजण त्यांचा प्रवेश सोमवारी होणार असल्याचे ठामपणे सांगू लागले आहेत. आ. जगताप यांनी मात्र यांचा इन्कार करत आपण राष्ट्रवादीकडूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यस्तरावर शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असून, पित्रपंधरवडा संपल्यानंतर युतीची अधीकृत घोषणा होईल, असे बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून आ. जगताप यांच्या गोटात हालचाली वाढल्या होत्या. मात्र नक्की काय चालले आहे, याबाबत कोणीही बोलत नव्हते. गुरुवारी दिवसभर मात्र आ.जगताप यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्‍चित असल्याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीचे काही नगरसेवकही याबाबत अनभिज्ञ असले, तरी अऩेकांनी काहीही होऊ शकते, असे सांगत कानावर हात ठेवले.

  • आ. जगताप काल दिवसभर मुंबईत असल्याची चर्चा होती. आ. जगताप यांनी मात्र याचा इन्कार केला.
  • मी शुक्रवारी सकाळी मुंबईत जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक असून, तसे निरोप मी स्वतः येथील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकार्‍यांना दिले आहेत, असे आ. जगताप म्हणाले.
  • माझ्या शिवसेना प्रवेशाची चर्चा विरोधकांकडून कायम घडवून आणली जाते. मात्र तसे काहीही नाही. मी राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढविणार आहे, असे त्यांनी सांगीतले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!