Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्हा परिषदेसमोर उद्या शिक्षकांचे धरणे आंदोलन

जिल्हा परिषदेसमोर उद्या शिक्षकांचे धरणे आंदोलन

संगमनेर (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वतीने येत्या 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नावर महाराष्ट्र सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले व राज्य उपाध्यक्ष संजय शेळके तसेच जिल्हा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आर. पी. राहणे, शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, गुरुमाउली मंडळ जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई भालेराव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.

यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना व जिल्ह्यातील शिक्षकांच्या उशिरा होणार्‍या पगाराचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरी मोठ्या संख्येने शिक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घुले, गुरुमाउली मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष भोर, विकास मंडळ विश्‍वस्त भाऊसाहेब ढोकरे, ज्येष्ठ नेते एस. डी. गायकवाड, उत्तर जिल्हाप्रमुख भीमराज उगलमुगले, गणेश वाघ, बेबी पानसंबळ, अनिता नेहे, द. स. सुपेकर, किशोर बिडवे आदींनी केले आहे.

  • शिक्षक परिषदेच्या आंदोलनातील मागण्या
  • नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षक व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
  • अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेवर करणे.
  • नवीन परिभाषित अंशदान पेन्शन धारकांच्या कपातीचे पूर्ण व अचूक हिशेब व 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी
  • जिल्हा परिषदांनी अदा करावी.
  • नवीन परिभाषित अंशदान योजनाधारक मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना तातडीने 10 लाखांची मदत करावी.
  • प्रलंबित निवड व वरिष्ठ वेतनश्रेणींचे प्रस्ताव तातडीने निकाली काढणे.
  • प्राथमिक शिक्षकांना मेडिक्लेम योजना लागू करणे.
  • जिल्हा परिषदांची बिंदुनामावली पूर्ण करणे.
  • 15 व्या वित्तआयोगातून शाळांना मदत करणे. वीज देयके अदा करणे.
  • शिक्षकांना वेतन अनुदानाऐवजी प्रति विद्यार्थी अनुदान देण्यासंदर्भातील नियुक्त अभ्यास गट तातडीने रद्द करणे.
- Advertisment -

ताज्या बातम्या