Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर तालुक्यातील 3 प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यता

Share

मुंबई- वारंवार दुष्काळ पडत असल्याने निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील संगनमेर तालुक्यामधील धांदरफळ बुद्रुक, जवळेकडलग, निमगाव भोजापूर व इतर 3 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत धांदरफळ बुद्रुक नळ पाणीपुरवठा योजनेस 531.76 लक्ष (निव्वळ), व 573.14 लक्ष (ढोबळ) इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमूद करण्यात आली आहे. यासाठी उपलब्ध स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून धांदरफळ बुद्रुक नळ पाणीपुरवठा प्रस्तावित योजनेसाठी प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर अस्तित्वात असलेली पाझर विहीर निवडण्यात आली आहे. प्रस्तावित येाजनेतून 40 लिटर प्रती माणसी पाणी उपलब्ध होणार आहे.

जवळेकडलग नळ पाणीपुरवठा योजनेस रुपये 823.47 लक्ष (निव्वळ) व रुपये 888.29 लक्ष (ढोबळ) इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमूद करण्यात आली आहे. यासाठी उपलब्ध स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून जवळेकडलग गावाची लोकसंख्या तपासून साठवण तलाव नळपाणीपुरवठा योजनेसाठी घेण्यात आले आहेत. तसेच प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर विहीर हा स्त्रोत पाणीपुरवठ्यासाठी निवडण्यात आला आहे.

नवीन प्रस्तावित योजनेतून 40 लिटर प्रती माणसी पाणी उपलब्ध होणार आहे.जवळेकडलग गाव प्रवरा नदीच्या तिरावर वसलेले असून प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येणार्‍या पाण्याचा आर्वतन काळ संपल्यानंतर पाणी कमी पडते. गावाची वाढीव लोकसंख्या व वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे.

निमगांव, भोजापूर व इतर 3 गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस रुपये 1393.86 लक्ष (निव्वळ) व रुपये 1504.52 लक्ष (ढोबळ) किंमतीच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी येथील अस्तित्वातील उपलब्ध स्त्रोतांद्वारे नळ पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असून या योजेनसाठी अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरणाची निवड करण्यात आली आहे. नवीन प्रस्तावित योजनेनुसार प्रती माणसी 40 लिटर एवढे पाणी उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सन 2019-20 च्या मंजूर कृती आराखड्यामध्ये या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. अ‍ॅड. गोविंद अमोलिक, के.सी.शेळके आदींचा समावेश आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!