Thursday, April 25, 2024
Homeनगरपुरस्कारप्राप्त 82 शिक्षकांना वेतनवाढ देण्याचे आदेश

पुरस्कारप्राप्त 82 शिक्षकांना वेतनवाढ देण्याचे आदेश

संगमनेर (वार्ताहर) – अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त 82 शिक्षकांना पुरस्कार प्राप्त दिनांकापासून वेतनवाढ देण्याचे आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिले आहे.

दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांमधून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा कार्यक्रम दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने शिक्षकदिनाच्या दिवशी दिवशी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. या शिक्षकांना यापूर्वीच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशामध्ये एक वेतनवाढ देण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली होती.

- Advertisement -

मात्र राज्यात सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या संदर्भाने वेतनवाढ न देण्याच्या संदर्भात वेगवेगळी भूमिका घेण्यात आलेली होती. त्यामुळे पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्कार मिळाले मात्र वेतनवाढ देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर पुरस्कारप्राप्त काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्तींनी याचिका दाखल केलेल्या शिक्षकांना आदर्श पुरस्कार मिळाला असल्याने व कायद्याच्या तरतुदी लक्षात घेता संबंधित शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात यावी अशा प्रकारचे आदेश प्रशासनाला दिले होते. आदेशानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या संदर्भाने उचित कार्यवाही करून न्यायालयात दाद मागितलेल्या शिक्षकांना एक वेतनवाढ देण्याचे आदेश दिले होते.

त्यात शिक्षकांना वेतनवाढ मिळाल्यानंतर उर्वरित 82 शिक्षकांनी देखील औरंगाबाद मध्ये वेतनवाढ मिळण्यासंदर्भात दाद मागितली होती. न्यायालयाने मागील निकालाच्या प्रमाणे निकाल देऊन वेतनवाढ देण्याचे आदेशित केले होते. शिक्षण विभागाच्या वतीने यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दाद मागणार्‍या शिक्षकांना पुरस्काराच्या दिनांकापासून वेतनवाढ देण्यात यावी. या दिनांकापासून आजपर्यंत फरक रक्कम देखील देण्यात यावी अशा प्रकारचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

उर्वरीत शिक्षक पुन्हा न्यायालयात
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या या शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्या शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर न्यायालयात दाद मागितली नाही, त्यांना वेतनवाढ मिळू शकली नाही. त्यामुळे उर्वरीत शिक्षकांनी वेतन वाढ मिळण्यासाठी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे. दरम्यान उर्वरीत शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केल्याचे समजते. 2006 पासून शिक्षकांना वेतनवाढी दिल्या गेल्या आहेत. 2006 ते 2019 पर्यंत 14 वर्षात 196 शिक्षकांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यापैकी न्यायालयात दाद मागितलेल्या शिक्षकांना वेतनवाढ देण्यात आल्याने उर्वरीत शिक्षकांना देखील देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या