Thursday, May 2, 2024
Homeराजकीयभाजपचा पराभव, राष्ट्रवादी विजयी

भाजपचा पराभव, राष्ट्रवादी विजयी

सांगली –

महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत पाच मते फुटल्याने भाजपचा पराभव झाला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत

- Advertisement -

महाविकास आघाडीकडून भाजपाला धक्का देत महापौर पद काबीज केले. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांनी बाजी मारली.

बहुमत असलेल्या सांगली महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचे आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आले आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता गमावावी लागली आहे.

सत्ताधारी भाजपची पाच मते फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. महापौर निवडीवेळी भाजपाचे दोन सदस्य गैरहजर होते. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत.

महापालिकेत भाजपाचे संख्याबळ पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले 41 आणि समर्थन दिलेले दोन अपक्ष असं एकूण 43 आहे. बहुमतासाठी 39 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39, तर धीरज सूर्यवंशी यांना 36 मते मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या