संगमनेरात आजपासून जिनिअस एज्युकेशन फेअर

0

दैनिक सार्वमत आयोजित

संगमनेर (प्रतिनिधी)- दैनिक सार्वमतच्यावतीने दोन दिवसीय जिनिअस एज्युकेशन फेअर 2017 चे गुरुवार दि. 15 व 16 जून 2017 रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज गुरुवारी सकाळी 11 वाजता माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समुहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी, कोपरगावच्या संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, श्रमिक उद्योग समुहाचे अध्यक्ष साहेबराव नवले, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या संचालिका शरयुताई देशमुख उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शैक्षणिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रायोजक अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग संगमनेर असून सह प्रायोजक कोपरगावचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट आहेत. त्याचबरोबर एस. एम. बी. टी. संगमनेर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणी,
धु्रव अ‍ॅकेडमी, संगमनेर, सेवा संस्कार संस्थेचे श्रमशक्ती शैक्षणिक संकुल, मालदाड, ता. संगमनेर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅण्ड पॉलिटेक्निक घारगाव, ता. संगमनेर, वामनराव इथापे पॉलिटेक्निक, संगमनेर, जयहिंद पॉलिटेक्निक, जुन्नर, सह्याद्री व्हॅली ऑफ इंजिनिअरींग, जुन्नर, अरिना अ‍ॅनमेशन्स नाशिक, माया अ‍ॅकेडमी ऑफ अ‍ॅडव्हान्स सिनेमॅटीक नाशिक, संदीप युनिर्व्हसिटी नाशिक या शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*