Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

पुणे- नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, ७ जखमी, 2 गंभीर

Share

संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चंदनापुरी घाट (आनंदवाडी) शिवारामध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात सात जन जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहेत. जखमींना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी शिवारामध्ये एक स्विफ्ट कार, टाटा कार आणि दुधाचा टँकर अशा तीन वाहनांमध्ये हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.

अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक एक तासापासून ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिस व टोलनाका कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत करून दिली

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!