शिवसेनेच्या मद्यधुंद नगरसेवकाकडून ग्रामीण रुग्णालयाच्या शिपायास मारहाण

0

संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – संगमनेर नगर पालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व प्रशांत झावरे यांनी मद्यधुंद अवस्थेत येऊन घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या शिपायास बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व प्रशांत प्रभाकर झावरे (दोघे रा. घोडेकरमळा, संगमनेर) हे अनंत परदेशी यास मारहाणीत जखमी झाल्याने औषधोपचारासाठी घेऊन आले. लखन घोरपडे याने शिपायास विचारले, कुठे आहे तुझा डॉक्टर, आमच्या पेशंटला बरे करा नाही तर तुम्हाला इथेच खुपसून टाकू असे म्हणून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे रुग्णालयातील महिला डॉक्टर व परिचारीका घाबरल्या.

 

घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यास देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे घटनास्थळी पोहचले. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नगरसेवक लखन घोरपडे याने पोलिसांनाही अरेरावी केली.

 

याबाबत दादा साबळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 245/17 भारतीय दंड संहिता 353, 323, 504, 506, 34 व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85 (1) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रजपूत करत आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून काल शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

‘मी संगमनेरचा नगरसेवक आहे. तू काय माझे वाकडे करणार’ असे म्हणून हॉस्पिटल जाळून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे डॉक्टर व स्टाफने जखमी रुग्णाला ड्रेसिंग रुममध्ये नेले. तेथेही घोरपडे याने येऊन अडथळा आणला. पोलिसांनी लखन घोरपडे व प्रशांत झावरे यास ताब्यात घेतले. त्यांची डॉ. कचेरीया यांनी वैद्यकीय तपासणी केली असता दोघे दारू पिलेले आढळून आले आहेत.

LEAVE A REPLY

*