संगमनेर : सणासुदीच्या काळात विजेचे नियोजन करण्यात सरकारला अपयश : आ.थोरात 

0
भारनियमनाच्या नियोजनांत भाजपा सरकार अपयशी 

संगमनेर : सध्या राज्यात सर्वत्र सणासुदीचा काळ सुरु आहे. मात्र शहर व ग्रामीण भागात अपुरी विज व मोठे भारनियमन यामुळे नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. ऐन सणासुदीच्या काळात विजेचा खेळखंडोबा झाला असून भाजपा सरकार भारनियमनचे नियोजन करण्यात पुर्ण:ताह अपयशी ठरले असल्याची टिका काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

अपुरी विज व भारनियमन यावर आमदार थोरात म्हणाले कि,दिवाळी जवळ आली आहे.सर्वत्र सणासुदीची धामधुम आहे.प्रकाशाचा हा सण सरकारने अंधारात चालविला आहे. शेती, व्यापार, औद्योगिकीकरण या सर्व क्षेत्रात भारनियमनाचा मोठा फटका बसला आहे हे राज्याच्या दृष्टीने हितवाद नाही.

काँग्रेस सरकारच्या काळातही भारनियमन झाले परंतू त्यावेळेस ग्रामीण भागात शेती डोळ्याासमोर ठेवून नियोजन झाले होते. आजचे सरकार मात्र भारनियमनाचे नियोजन करण्यात पुर्ण:ताह अपयशी ठरलेले आहे. भारनियमनामुळे काँग्रेस आघाडी सरकारवर टिका करणारे आता मात्र गप्प आहे. त्यांचेकडे कोणतेही ठोस उत्तर किंवा विजेचे नियोजन नाही.

काँग्रेस हा सर्व धर्म समभाव जोपासत सर्वांना विकास प्रक्रियेत सामावून घेवून वाटचाल करणारा पक्ष असल्याने आगामी काळात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल असा विश्‍वास ही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*