Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

भीषण अपघातात कोल्हारमधील व्यावसायिकासह दोघांचा मृत्यू

Share

पत्नीवर रुग्णालयात उपचार; कर्‍हे घाटाच्या पायथ्याच्या वळणावरील घटना

संगमनेर, कोल्हार (प्रतिनिधी) – आयशर टेम्पो व बोलेरो जीप यांच्यात धडक झाली. या अपघातात कोल्हार येथील अष्टविनायक टेडर्सचे मालक विजय गंगाधर खर्डे (वय 50 रा. कोल्हार, ता. राहाता), यांच्यासह सुमित संजय बनकर (वय 19, रा. हिवरेतर्फे, नारायणगाव, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेेत. त्यात विजय यांची पत्नी ज्योती खर्डे (वय 45, रा. कोल्हार, ता. राहाता), फिलीप्स भोसले (रा. कोल्हार, ता. राहाता) यांचा समावेश आहे. ही घटना रविवारी दुपारी 1.45 वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कर्‍हे घाटाच्या पायथ्याला घडली.

विजय खर्डे यांचा मुलगा नाशिकला शिकायला असल्याने त्याला आणण्यासाठी हे कुटुंब चालले होते. त्याचवेळी काळाने घाला घातला. आयशर टेम्पो हा नाशिककडून संगमनेरकडे येत होता. मात्र तो चुकीच्या दिशेने येत होता. तर बोलेरो जीप ही संगमनेरकडून नाशिकच्या दिशेने चालली होती. या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर आयशर टेम्पो पलटी झाला. अपघात घडताच रस्त्याने जाणार्‍या नागरिकांनी अपघातातील जखमींना वाहनातून बाहेर काढले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचेही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने संगमनेेर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. सुमित बनकर हा जागीच ठार झाला होता तर विजय गंगाधर खर्डे यांना उपचारार्थ रुग्णालयात नेत असतांना मयत झाले. ज्योती विजय खर्डे ही महिला गंभीर जखमी असून तिला पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. जखमी ज्योती खर्डे या कोल्हारचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यांच्या मावस बहिण आहेत.  विजय खर्डे यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडिल तसेच संजय, अजय, राहुल हे तीन भाऊ असा परिवार आहे.  घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 69/2019 नुसार नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार तोडकरी करत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!