संगमनेर फेस्टिव्हल : पाच मैत्रिणींच्या ‘सेल्फी’ने जिंकली संगमनेरकरांची मने

0
संगमनेर (प्रतिनिधी) – आजकाल कोणतेही निमित्त साधून ‘सेल्फी’ काढण्याचे फॅड सर्वत्र पाहायला मिळतेे. मात्र आपणच आपल्या आयुष्याकडे निरखून पाहायचे आणि ते मनाच्या आठवणीत साठवून ठेवायचे यालाही ‘सेल्फी’च म्हणता येईल. आपल्या कळत-नकळत आपण वारंवार असे ‘सेल्फी’ काढीत असतो. अशाच ‘सेल्फी’च्या माध्यमातून स्वतःचा शोध घेण्यार्‍या अभिनव संकल्पनेवर आधारित पाच मैत्रिणींच्या जीवनावरील ‘सेल्फी’ या नाट्यप्रयोगाने महिलांच्या जीवनातील विविध पैलू उलगडले.
संगमनेर फेस्टिव्हलच्या आजच्या सातव्या दिवशी मराठी रंगभूमीवर तुफान गाजलेले, पाच जीवाभावाच्या मैत्रिणींच्या जीवनावर आधारित असलेले ‘सेल्फी’ हे नाटक सादर झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योगपती राजेश मालपाणी, संगमनेर मर्चन्टस्चे अध्यक्ष प्रकाश राठी, संचालक राजेंद्र वाकचौरे, ओंकार सोमाणी, सुनील दिवेकर, प्रकाश कलंत्री, ज्ञानेश्‍वर करपे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर, ओंकार अट्टल यांच्या हस्ते गणरायांची आरती झाली. आमदार बाळासाहेब थोरात यांनीही मध्यंतरात येऊन संगमनेर ङ्गेस्टिव्हलला हजेरी लावली.
निरनिराळ्या क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन या संकल्पनेवर आधारलेल्या या नाटकात स्वाती कवठेकर (सुकन्या कुलकर्णी), विभावरी जोगल (सोनाली पंडित), तनुजा शर्मा (शिल्पा नवलकर), मिनाक्षी (ऋतूजा देशमुख) आणि शाल्वली प्रधान (पूर्वा गोखले) या पाच जणी रेल्वे उशीराने येणार असल्याने प्रतिक्षा कक्षात एकत्रित झाल्या. एकमेकींशी झालेल्या संवादातून त्यांच्यात मैत्री जडली. त्यातून प्रत्येकीच्या जीवनातील अंतरंग उलगडत गेले. महिलांच्या आयुष्यातील विविध पैलु उलगडणार्‍या या नाटकाने संगमनेरकरांचे पुरेपूर मनोरंजन केले.

संगमनेर फेस्टिव्हलच्या माध्यमातून मनोरंजनाच्या विविध दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना दरवर्षी संगमनेरकरांपुढे खुला होत असतो. गणेशोत्सवात सर्व आनंद आणि उल्हासाचे वातावरण असते. गेल्या 10 वर्षांपासून या उत्सवा दरम्यान संगमनेरात ङ्गेस्टिव्हलचे आयोजन होत आहे. खरेतर इतके चांगले व दर्जेदार कार्यक्रम आयोजित करुन सांस्कृतिक संगमनेरची प्रतिभा अधिक उंचावणार्‍या राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाचे आभारच मानायला हवेत.

–  आ. बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

*