Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेरात पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम संगमनेर नगरपालिकेच्यावतीने काल राबविण्यात आली. सकाळीच या मोहिमेला महसूल अधिकारी व पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाल्याने अतिक्रमणधारकांची धावपळ उडाली.
शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असल्याने अनेकदा नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोेहीम राबविली.

तरी देखील अतिक्रमण होेतच राहिल्याने अखेर पालिकेने काल सकाळीच अचानक अतिक्रमण हटाव मोेहिमेस प्रारंभ केला. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, सफाई कामगार या मोहिमेत सहभागी झाले. रस्त्यावरील बांधकामे, पत्र्याचे शेड, बेकायदेशीर टाकलेल्या टपर्‍या जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आल्या.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात, तहसीलदार अमोल निकम, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका निरीक्षक सुनील पाटील, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्यासह पालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस मोेहिमेत सहभागी झाले होते.

अतिक्रमण काढत असताना अतिक्रमणधारकांमध्ये संतापाचे वातावरण होते. अतिक्रमण धारकांच्या विरोधाला न जुमानता पालिकेने जोरदारपणे कारवाई केली. दिल्ली नाका परिसरात अतिक्रमणधारकांचा किरकोळ विरोेध वगळता अन्यथा कुठेही मोहिमेत अडथळा आला नाही. दोन जेसीबी यंत्राच्या साहाय्याने अतिक्रमण काढण्यात येत होते. अतिक्रमणमध्ये काढलेले पत्र्याचे शेड व अन्य सामान पालिकेचे कर्मचारी ट्रॅक्टरमध्ये जप्त करत होते. पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील या प्रमुख मार्गाने मोेकळा श्‍वास घेतला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!