वडगावपानमध्ये 37 हजारांच्या देशी दारुसह मारुती वॅगनर पकडली

0

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर वडगावपान फाटा शिवारात बेकायदा देशी दारूची वाहतूक करणारी मारुती वॅगनर पकडली. 70 हजार किंमतीच्या मारुती वॅगनर गाडीसह 37 हजार 440 रुपयांची बेकायदा बॉबी संत्रा देशीदारू पोलिसांनी जप्त केली.

 

 

शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ज्ञानदेव तुळशीराम दाते यास पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

संगमनेर-कोपरगाव रस्त्याने बेकायदा देशीदारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आनंद धनवट, बाबासाहेब खेडकर, लुमा भांगरे व यमना जाधव यांच्या पथकाने सापळा लावून वडगावपान फाटा शिवारातील रस्त्यावर मारुती वॅगनर गाडी (क्र. एम. एच. 04 बी. क्यू. 121) पकडली. या वॅगनर गाडीत 37 हजार 440 रुपयांची बेकायदा बॉबी संत्रा देशीदारूचे 15 बॉक्स आढळून आले.

 

 

आरोपी ज्ञानदेव तुळशीराम दाते (वय 50 रा. घोडेकर मळा, संगमनेर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. 70 हजार किंमतीची वॅगनर गाडी व 37 हजार 440 रुपयांची देशीदारू असा मिळून 1 लाख 7 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पो. कॉ. बाबासाहेब महादेव खेडकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम (अ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

 

आरोपी ज्ञानदेव दाते यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आनंद धनवट अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*