संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कर्मचार्‍याची ‘पाटीलशाही’

0
संगमनेर (तालुका प्रतिनिधी) : पोलीस म्हटलं की गावाला धाक…शहराला धाक….जिल्ह्याला धाक…मात्र या धाक दाखविणार्‍याच पोलिसाचं वर्तन सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस ठाणे अंमलदाराच्या टेबलवर बसून मजेत टिव्ही पाहण्यात दंग असणार्‍या ‘पाटलाने’ बेशिस्तीचा कळसच गाठला आहे.
यावरुनच शहर पोलीस अधिकार्‍यांचा धाक शहरासह ठाण्यातूनही गायब झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अवैध धंद्यांनी शहराचं नाव राज्यासह राज्याबाहेर पोहचवलं. तसेच येथील अधिकार्‍यांचे कारनामेही गाजले. कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजबारा उडलेला असतांना शहरात शांतता कशी नांदेल? याचा विचार करणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या विचारांना व शिस्तीला खुद्द पोलीस कर्मचार्‍यांनीच तिलांजली दिली आहे.
पोलीस ठाण्यात दाखल होताच मदत कक्ष त्यानंतर पोलीस ठाणे अंमलदार कक्षाचे दर्शन होते. याच दर्शनी भागात लावलेल्या टिव्हीवरील कार्यक्रम पाहण्यात पोलीस कर्मचारी दंग राहताना दिसत आहे. बसण्यासाठी पोलीस कर्मचार्‍याने थेट ठाणे अंमलदाराच्या टेबलावरच बस्थान मांडले आहे. त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍यांना पोलिसाचा धाक कसा राहील? असा प्रश्‍न पडतो आहे. बेशिस्तीचे दर्शन देणार्‍या या कर्मचार्‍यावर वरिष्ठ काय कारवाई करतील? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

*