संगमनेरात 22 कॅमेर्‍यांचा वॉच; रविवारी लोकार्पण सोहळा

0

संगमनेर (प्रतिनिधी)-सावधान! आपण तिसर्‍या डोळ्याच्या कक्षेत आहात.. लवकरच शहराच्या चौकाचौकात मनात हेतू घेऊन वावरणार्‍यांसाठी असा सावधानतेचा इशारा झळकणार आहे.

संगमनेर पोलीस व राजस्थान युवक मंडळाने पुढाकार घेत शहरातील काही दानशूरांच्या मदतीने हा उपक्रम अंतिम टप्प्यात नेला आहे.

येत्या रविवारी होत असलेल्या कार्यक्रमात 22 कॅमेर्‍यांचे लोकार्पण होणार असल्याची माहिती या उपक्रमाचे समन्वयक पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांनी दिली.

राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने तेथील गुन्हेगारी नियंत्रणात आणणे पोलीसांना अधिक सोयीचे बनले आहे.

त्या अनुषंगाने संगमनेरातही हा प्रयोग साधता येईल या हेतूने संगमनेर पोलीसांनी राजस्थान युवक मंडळाला सोबतीला घेऊन शहरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, मोठे व्यापारी यांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी केला आहे.

LEAVE A REPLY

*