संगमनेर बसस्थानकावर 1 लाख रुपयांची चोरी

0
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर बस स्थानकावर धामणगाव आवारी येथील शेतकरी बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्याजवळील 1 लाख रुपयांच्या रोख रकमेची चोरी केल्याची घटना सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.
किसन रावबा आवारी (रा. धामणगाव आवारी, ता. अकोले) हे टोमॅटो मालाचे पेमेंट घेण्यासाठी संगमनेरला आले होते. दोन लाख रुपयांचे पेमेंट घेवून संगमनेर बस स्थानकावर पोहचले. एक लाख रुपये खिशात तर एक लाख रुपये पिशवीत होते.
बसमध्ये चढत असतांना त्यांच्या खिशातील एक लाख रुपये चोरट्याने लांबविले. बसमध्ये बसल्यावर त्यांच्या ही घटना लक्षात आली. याबाबत आवारी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण करत आहे.

LEAVE A REPLY

*