Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुणे -नाशिक महामार्गावर कार कंटेनर अपघातात तीन ठार

Share

संगमनेर ( प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावर कर्हे घाट नजीक ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री घडला.

या अपघातात गणेश सुखदेव दराडे, श्रीकांत बबन आव्हाड, अजय श्रीधर पेदाम हे तीन तरुण जागीच ठार झाले आहे. नांदुर-शिंगोटे वरून कऱहे गावाकडे येत असताना ही कार पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडकली.

अपघात इतका भीषण होता की, कारमधील तिघेही युवकांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस कॉन्स्टेबल रफिक पठाण, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधील तिघा युवकांना बाहेर काढलं. अपघातामुळे पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!