खराडीत वीज अंगावर पडून शेतकर्‍याचा मृत्यू

0

संगमनेर (प्रतिनिधी) | तालुक्यातील खराडी येथे आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरु असतांना विज जमीनीवर कोसळली.

शेतात कांदे झाकण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर ही विज पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बाळासाहेब निवृत्ती साबळे (वय 50) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. बाळासाहेब साबळे हे सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आपल्या शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते.

त्यावेळी विजांचा कडकडाट सुरु होता. त्यावेळी वीज जमिनीवर कोसळली. विजेच्या धक्क्याने कांदे झाकत असलेले बाळासाहेब साबळे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले.

याबाबत खराडी-वाघापूरच्या कामगार तलाठी रत्नप्रभा गागरे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे.

LEAVE A REPLY

*