Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

महाराष्ट्र बँकेचे एटीएम उचलून नेत १७ लाखांची रोकड लांबवली; संगमनेरमधील प्रकार

Share

संगमनेर (प्रतिनिधी) | शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून उचलून नेत त्यातील सुमारे 17 लाख रुपयांची रक्कम लांबविले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

पुणे-नाशिक हायवेवर संगमनेर कॉलेजजवळ बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन तोडून उचलून नेले.

त्यातील 17 लाख रुपये चोरट्यांनी लांबवले. संगमनेर शहरात एटीएम फोडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. गेल्याच वर्षी स्टेट बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी 39 लाख रुपयांची रक्कम लांबवली होती, त्याचाही तपास अद्याप लागला नसताना चोरट्यांनी पुन्हा संगमनेरात एटीएम फोडले.

घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी घटनास्थली भेट देवून पाहणी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!