संगमनेर : थकीत कर्जाप्रकरणी बद्रिनारायण लोहे यांना एक वर्ष तुरुंगवास

0

जिल्हा व सत्र न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब

संगमनेर (प्रतिनिधी )– थकीत कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्याने शहरातील प्रसिध्द व्यापारी बद्रिनारायण लक्ष्मीनारायण लोहे यांना झालेली एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा संगमनेरच्या वरीष्ठ न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यांनी शारदा नागरी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. या खटल्यात संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली होती, त्यावर त्यांनी दाखल केलेले अपील फेटाळीत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे.
बद्रिनारायण लोहे यांनी शारदा नागरी सहकारी पतसंस्थेकडून पाच वर्षे मुदतीचे कर्ज घेतले होते. मात्र ठरल्यावेळेत ते कर्ज फेडण्यास ते असमर्थ ठरल्याने संस्थेने नोटीस बजावून त्यांना कर्ज भरण्यास सांगीतले. त्यानुसार त्यांनी 6 एप्रिल 1999साली संस्थेला 9 लाख 22 हजार 355 रुपयांचा बँक ऑफ बडोदाचा धनादेश दिला होता. मात्र संस्थेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी 7 एप्रिल 1999 राजी सदरचा धनादेश बँकेत भरला असता त्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम नसल्याने तो न वटताच माघारी आला.
त्यानंतर 15 एप्रिल 1999 रोजी संस्थेने ऍड.राजेश भुतडा यांच्यामार्फत कर्जदाराला नोटीस बजावून थकीत बाकी भरण्यास सांगीतले. मात्र त्या उपरांतही त्यांनी कोणतीही हालचाल न केल्याने अखेर संस्थेने थकीत कर्जदार बद्रिनारायण लक्ष्मीनारायण लोहे यांच्या विरोधात संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल केला. त्यावर सविस्तर सुनावणी होऊन न्यायालयाने 3 नोव्हेंबर 2007 पूर्वी थकीत कर्जापोटी व्याजासह 23 लाख 32 हजार 421 एकरकमी न भरल्यास त्यांना एक वर्षे साध्या तुरुंगवासाची व 2500 रुपये दंडाची, दंड न भरल्यास तिन महिने अतिरीक्त कैदेची शिक्षा सुनावली होती.
या विरोधात त्यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावरील सुनावणी पूर्ण होऊन न्यायमूर्ती संजीव शर्मा यांनी बद्रिनारायण लोहे यांना दोषी धरुन प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. या निर्णयाने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*