संगमनेर : सहकारमहर्षी चषक : 1 ते 17 जानेवारी T20 राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0

संगमनेर : क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जयहिंद युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहकारमहर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संगमनेर शहरात 1 जानेवारी 2018 ते 17 जानेवारी 2018 या दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

सहकारमहर्षी चषक ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेची व नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. उत्तम दर्जाच्या संघाचा सहभाग,आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन व प्रचंड उत्साही प्रेक्षक ही या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्यो आहेत.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1,00,000/- (एक लाख ) रुपये,द्वितीय क्रमांकास रु.71,000/-(एकसष्ठ हजार),तृतीय क्रमांकास रु.51,000/- (एकतीस हजार ) , चतुर्थ बक्षीस 21,000/- ( एकवीस हजार ) असुन इतरही वैयक्तीक बक्षीसांचा समावेश असणार आहे.

राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या स्पर्धेचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी किमान 10000 प्रेक्षकांची उपस्थिती लाभत असते. प्रत्येक सामना हा दर्जेदार व रंगत असतो यापुर्वी या सामन्यांसाठी बी.सी.सी आयचे उपाध्यक्ष खा.राजीवजी शुक्ला,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजयजी शिर्के,सिने अभिनेत्री महिमा चौधरी,अमृता खानवीलकर , प्रणव धनवडे तसेच इतरही अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे.

यावर्षी ही स्पर्धा अधिक आकर्षक होणार असून सिने सृष्टीतील अनेक कलावंताची उपस्थिती लाभणार आहे.

LEAVE A REPLY

*