संगमनेर नगरपालिकेच्यावतीने कचरा वर्गीकरणास सुरुवात

0
संगमनेर (प्रतिनिधी) – स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत कचरा वर्गीकरण व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ संगमनेर नगरपालिकेच्यावतीने शहरातील नायकवाडपुरा येथील अ‍ॅग्लो उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष नितीन अभंग, आरोग्य समिती सभापती डॉ. दानिश खान, पाणीपुरवठा समिती सभापती बाळासाहेब पवार, नगरसेवक किशोर पवार, नूरमहम्मद शेख, सुहासिनी गुंजाळ, रूपाली औटी, सोनाली शिंदे, प्रियंका बरेकर, किशोर टोकसे, रिजवान शेख, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत शहर स्वच्छ करण्यासाठी शहरात निर्माण होणारा कचरा निर्मितीच्याच जागी ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन स्वतंत्र्यपणे संकलित करण्याचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅग्लो उर्दु हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सदर प्रभागात जनजागृतीसाठी स्वच्छता फेरी काढली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आरोग्य समिती सभापती डॉ. दानिश खान यांनी कचरा वर्गीकरणाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना आपल्या घरातूनच ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याची सूचना केली. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टिकचा वापर अत्यंत घातक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर म्हणाले, शहराच्या स्वच्छतेसाठी ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. कचर्‍याची निर्मिती होतांना शहरातील प्रत्येक कुटुंबास आपल्या घरातील ओला व सुका कचरा दोन स्वतंत्र डस्टबीन मध्ये संकलीत करण्याचे बंधनकारक असणार आहे. तसेच शहरातील हातगाडीवरील खाद्य विक्रेते, हॉटेल्स, फळ, भाजी, पाला विक्रते यांनी सुध्दा आपला कचरा स्वतंत्रपणे संकलित करुन नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी इसाकखान पठाण, मिलिंद औटी, आबासाहेब शिंदे, कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ यांसह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*