Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; ‘त्या’ शेतकरी दांम्पत्याला शपथविधीचे निमंत्रण

Share

मुंबई | प्रतिनिधी 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी आवर्जून त्या शेतकरी कुटुंबाला शपथविधीसाठी निमंत्रित केले आहे, ज्यांनी उद्धव यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर शपथविधीला यायची इच्छा व्यक्त केली होती.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या नुकसानाहीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी ते सांगलीच्या दौऱ्यावर गेले होते.  यावेळी संजय व त्यांच्या पत्नी रुपाली सावंत या शेतकरी दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून उपवास केले होता.

तसेच हे दाम्पत्य 85 किमी अनवाणी पायाने चालत पंढरपूरलादेखील गेले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर आम्हाला जवळ उभे राहू द्या अशी विनंती उद्धव यांच्याकडे या दाम्पत्याने केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्टेजसमोर नाही तर स्टेजवर जागा मिळेल असे आश्वासित केले होते.

उद्धव यांच्या दौर्यादरम्यान या दाम्पत्याची छायाचित्रे  सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. शिवसेनेने सत्ता भाजपच्या तोंडातून खेचून आणण्यात यश मिळवल्यानंन्तर उद्धव यांच्या शपथविधीची तारीख ठरली. यावेळी निमंत्रितांमध्ये या शेतकरी दाम्पत्याचे नावदेखील उद्धव यांनी टाकण्यास सांगत रीतसर त्यांनी निमंत्रण पाठविले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!