त्र्यंबकरोड अपघातात संदिप फाऊंडेशनचा विद्यार्थी ठार; एक गंभीर

0

सातपूर (प्रतिनिधी) ता. ५ :  संदिप फाऊंडेशनच्या दोन विद्यार्थ्यांना आज पहाटे अज्ञात वाहनाने चिरडल्याने एक विद्यार्थी जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे.

संदिप युनिव्हर्सिटी परिसरात नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर महिरावणीजवळ पहाटे ३ ला हा अपघात घडला.

मयूर पाटील (रा. चोपडा) हा विद्यार्थी जागीच ठार झाला, तर किरण माळी हा गंभीर जखमी असून त्याला नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हे विद्यार्थी महिरावणी गावात खोली घेऊन राहत होते.  पुण्याला सहलीसाठी जात असताना संदिप फाऊंडेशनच्या गेटजवळ जात असताना हा अपघात घडला.

आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्र्यंबकेश्वर पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या ठिकाणी गतीरोधक टाकण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. शासन आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल महिरावणीचे सरपंच रमेश खांडबहाले यांनी केला आहे.

या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. मात्र मागणी करूनही येथे गतिरोधक टाकण्यात आलेले नाही.

LEAVE A REPLY

*