महिरावणीजवळील अपघातात संदिप फाऊंडेशनची विद्यार्थीनी ठार

0

सातपूर (प्रतिनिधी ) ता. १३ : नाशिक –त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी गावाजवळ आज सायंकाळी झालेल्या अपघातात संदिप फाऊंडेशनची विद्यार्थीनी जागीच ठार झाली.

हर्षिका प्रदीप सुर्वे असे ठार झालेल्या विद्यार्थीनीचे नाव असून ती बीई मेकॅनिकल शाखेत शिक्षण घेते. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणीसोबत त्र्यंबकरोडने पायी जात असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या पल्सर मोटरसायकलचा तिला उडविल्यानंतर त्र्यंबककडून येणाऱ्या बसच्या मागच्या चाकाखाली  येऊन ती जागीच ठार झाली.

महिरावनी संदीप फाउंडेशन लश्रस जवळ तरुणी चा अपघात मधे जागीच ठार ङ्ग  लश्रस सुटल्यानंतर २ मैत्रीण पायी चालत असताना चुकीच्या साईड ने येणार्‍या पल्सर ने उडवल्या नंतर ती त्रंबक कडून येणार्‍या बसच्या मागच्या चाका खाली जावून जागीच ठार झाली.

या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची, तसेच सकाळ आणि सायंकाळी महाविद्यालयातील गर्दीच्या वेळेस वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची नागरिकांनी वारंवार मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या मागणीची दखल न घेतल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*